मोहिते गॅस एजन्सीच्या शहरातील ग्राहकांवर चूल पेटविण्याची वेळ

0

 

Residents Forced to Use Traditional Stoves as Mohite Gas Agency Fails to Deliver LPG


बार्शी विशेष : बार्शी शहरातील 'मोहिते भारत गॅस एजन्सी' कडील गॅस ग्राहकांना ४५ दिवसानंतरच सिलेंडर मिळत असल्यामुळे चूल पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे.


भारत गॅसच्या शहरातील दुसऱ्या वितरकाकडील ग्राहकांना मात्र २५ दिवसानंतर सिलेंडर मिळत आहे. मग मोहिते यांचेकडील ग्राहकांना ग्रामीणसाठी असलेला ४५ दिवस प्रतिक्षेचा नियम का? 


याबाबत 'बार्शी विशेष' ने १६ एप्रिल रोजी बातमी प्रसिध्द करुन बार्शी शहर 'ग्रामीण' की 'शहर' ? याचा खुलासा प्रशासनाने करण्याची मागणी केली होती. मात्र यावर प्रशासनाने याविषयावर अद्यापही मौन बाळगले आहे. 


याचा पाठपुरावा करताना 'बार्शी विशेष' समोर काही बाबी आल्या आहेत. त्याबाबतचा खुलासा लवकरच करण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)