खाजगी शाळांची मनमानी थांबवून कठोर कारवाई करा; डिजिटल मीडिया पत्रकार संघाची मागणी

0

 

digital-media-journalists-demand-action-against-private-schools

बार्शी विशेष : खाजगी शाळांकडून पालकांची होत असलेली पिळवणूक त्वरित थांबवून नियमबाह्य पध्दतीने मनमानी कारभार करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी यासंदर्भात बार्शीच्या 'डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशन'च्यावतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले.


बार्शी तालुका गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांना दिलेल्या निवेदनात, शिक्षण संचालनालयाचे आदेश डावलून अनेक खाजगी शाळांकडून विशिष्ट दुकानातूनच गणवेश, शालेय साहित्य तसेच खाजगी प्रकाशकांची पुस्तके घेण्याची होत असलेली सक्ती, कित्येक शाळेत उपलब्ध नसलेली शुद्ध पेयजलाची (फिल्टर्ड वॉटर) व्यवस्था, शालेय प्रवेश प्रक्रियेत इंटरव्ह्यू संस्कृतीचा झालेला शिरकाव, दाखला व गुणपत्रिका देताना घेतले जाणारे बेकायदेशीर शुल्क आदि समस्यांचा उल्लेख आहे.


त्यासोबतच शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांना थेट तक्रार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अधिकृत हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल आयडी त्वरित जाहीर करावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली असून, यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कायदेशीर कारवाई न केल्यास पालकांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


सदर निवेदन देतेवेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी विनोद ननवरे, गणेश शिंदे, अभिजीत शिंदे, समाधान विधाते, संतोष कानगुडे, राजश्री गवळी आदि उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)