| Barshi Vishesh Digital Newspaper |
बार्शी विशेष : बार्शी शहरातील तेलगिरणी चौक परिसरात एका सायकल दुकानात सुरू असलेल्या 'कल्याण-मुंबई' मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रमाकांत पिसे यांच्या सायकल दुकानात छापा टाकला असता, गणेश सोमनाथ पिसे (वय ३३), सुदेश पांडुरंग खुळपे (वय ३६) आणि शाम सोमनाथ काशीद (वय ३०) हे नागरिकांकडून पैसे घेऊन मटका खेळवताना रंगेहाथ सापडले.
पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमोल सोमनाथ पिसे याच्या सांगण्यावरून हा जुगार अड्डा चालवला जात असल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोकॉ इसमिया बहिरे करत आहेत.
ही कारवाई पोलीस हेकॉ बाबासाहेब घाडगे, महिला पोकॉ नम्रता गटकुळ, व चालक महानोर यांनी केली.
