Barshi Vishesh Digital Newspaper
बार्शी विशेष : राज्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे.
यानुसार राज्यातील कोणत्याही व्यवस्थापनाच्या खाजगी शाळांना आता पालकांवर विशिष्ट दुकानातूनच गणवेश, वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर थेट प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी आणि शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त स्वाक्षरीने नवे परिपत्रक काढून दिला आहे.
पण प्रत्यक्षात या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून अनेक शाळा पालकांना ठराविक दुकानातूनच गणवेश, साहित्य खरेदी करण्याची सक्ती करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते.
- पालकांना विशिष्ट दुकानातून गणवेश व शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करु नये.
- राज्य मंडळाच्या शाळांनी केवळ NCERT किंवा SCERT (बालभारतीची) पाठ्यपुस्तके वापरावीत. कोणत्याही खाजगी प्रकाशकाची पुस्तके घेण्याची सक्ती करू नये.
- हा आदेश राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना लागू राहील.
- शाळांनी गणवेशापेक्षा 'गुणवत्ते'कडे लक्ष द्यावे.
- फक्त परिपत्रक काढून उपयोग नाही, कडक अंमलबजावणी करावी.
- परिपत्रकानुसार किती शाळांवर कारवाई केली याची माहिती प्रसिद्ध करावी.
- तक्रारीसाठी संपर्क क्रमांक, ईमेल जाहीर करावा.
