बार्शी आगारातील बसेसमुळे प्रवाशांच्या जीवीताच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

0

Safety of Passengers at Risk Due to Barshi Depot Buses
Barshi Vishesh Digital Newspaper

बार्शी विशेष : बार्शी आगारातून धावणाऱ्या बसेसचे चाक पंक्चर होणे, बस बंद पडणे, छत गळणे, खिडक्यांच्या काचा जाम होणे यासारखे प्रकार तर सततच घडत आहेत, आणि प्रवाश्यांतून त्याबद्दल नेहमीच ओरड होत आहे. 


पण आता तर चालू बसमधील फ्लोअरचा पत्रा उचकटून निघाला, सायलेन्सरमधून फायरिंग केल्यासारख्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या, यासारखे प्रकार घडायला  लागल्यामुळे  प्रवाशांच्या जीवीताच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असूनही बार्शी आगार व्यवस्थापनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 


त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यावरच व्यवस्थापनाला जाग येणार का असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.


प्रवासी म्हणतात...

  • प्रत्येक प्रवाशांकडून स्वच्छता कर वसूल केला जात असूनही बसेस स्वच्छ नाहीत.
  • बार्शी आगारात हॉर्न सोडून सगळे पार्ट वाजतात अशा बसेसचा भरणा आहे.
  • तिकीट तर आहे तेवढेच घेता, मग चांगल्या, स्वच्छ बसेस वेळेवर का सोडल्या जात नाहीत?
  • आरटीओ खात्याने बसेसची तपासणी करुन 'फिटनेस सर्टिफिकेट' प्रत्येक बसमध्ये प्रवाशांना दिसेल अशा पध्दतीने लावावे.
  • 'फिटनेस सर्टिफिकेट' नसलेल्या बसेस कोणत्याही मार्गावर धावताना दिसल्यास आगार व्यवस्थापन आणि संबंधितांवर कारवाई करावी.

 या बातम्यांच्या व्हिडीओ लिंक्स:

https://www.facebook.com/share/v/1CU4TijTu3/

https://www.facebook.com/share/r/1ChhMdPyQp/

https://www.facebook.com/share/r/1BRvR2uZGm/

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)