Barshi Vishesh Digital Newspaper
बार्शी विशेष : दगड उत्खननाचे फोटो काढून तहसीलदारांना का पाठविले या कारणावरुन दै. पुण्यनगरीचे प्रतिनिधी प्रशांत खराडे यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी चारचे सुमारास घडली. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार ३१ मे रोजी दुपारी चारचे सुमारास ते घरी विश्राम करत असताना सचिन ऊर्फ बाळू जाधव (रा. सुभाष नगर, बार्शी) आणि त्याचे इतर दोन साथीदार त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये आले, आणि तू सुनील भराडियाच्या खाणीच्या खोदकामाचे फोटो का काढलेस? आणि ते तहसीलदारांना का पाठवलेस? असा जाब विचारत सचिन जाधव याने खराडे यांची गच्ची पकडून त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली.
यावेळी त्यांची पत्नी आणि घरकाम करणाऱ्या दोन महिलांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, तुमचा यात काही संबंध नाही म्हणत त्यांनाही शिवीगाळी करुन दमदाटी केली.
