तोंडाला चिकटपट्टी बांधलेल्या २६ खोंडाची सुटका; पोनि बालाजी कुकडे यांची माढ्यात कारवाई

Admin
0

 

26 calves rescued taped with mouths; action by PI Balaji Kukade in Madha

26 calves rescued taped with mouths; action by PI Balaji Kukade in Madha


बार्शी विशेष : कत्तलीच्या उद्देशाने तोंडाला चिकटपट्टी लावून घराच्या परिसरात बांधून ठेवलेल्या जर्सी गायींच्या २६ लहान खोंडाची सुटका बार्शी शहर पोनि बालाजी कुकडे यांनी माढा येथे जाऊन केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी ही कारवाई केली.

९ जानेवारी रोजी पोनि बालाजी कुकडे हे पोना सुरवसे, पोकॉ बरबडे, तांबोळी, सोमवाड यांच्यासह रात्रगस्त करत होते. रात्री २ चे सुमारास त्यांना माढा येथील बस स्टँड मागे असलेल्या खाटीक गल्लीत जाकीर कुरेशी यांचे घराचे परिसरात कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंश जातीची लहान खोंडे बांधून ठेवलेली आहेत अशी माहिती मिळाली.

माहिती मिळताच माढा येथे जाऊन कुकडे यांनी स्थानिक पोलिसांसह नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, जर्सी गायीची २६ लहान खोंडे तोंडाला चिकटपट्टी बांधून, हालचाल करता येणार नाही, त्यांच्यासाठी चारा, पाणी, निवाऱ्याची सोय नाही अशा रितीने आखूड दोरीने घराच्या परिसरात बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली.

चौकशीअंती सदर जनावरे जाकीर कुरेशी, अन्सार कुरेशी व इम्तीहाज जाकीर कुरेशी (सर्व रा. खाटीक गल्ली, बस स्टँडमागे, माढा) यांची असल्याची माहिती समजली. सुरक्षेच्या दृष्टीने सदर जनावरे ताब्यात घेऊन पोलिसांनी माढेश्वरी गोशाळा, उपळाई खुर्द, ता. माढा येथे जमा केली.

पोकॉ रोहित माने (नेमणूक माढा पोलिस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शकील कुरेशी, रा. माढा याचेविरुध्द प्राणी छळ प्रतिबंध १९६० व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोनि बालाजी कुकडे यांनी भूतदयेच्या दृष्टीकोनातून कार्यक्षेत्राची हद्द ओलांडत माढा येथे जाऊन गोवंश जनावरांची सुटका केली, त्यांच्या या कृतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)