कारमधील गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा पर्दाफाश; बार्शी तालुका पोलिसांची कारवाई

Admin
0

 

Pregnancy diagnosis and abortion in a car; Barshi Taluka Police take action

Pregnancy diagnosis and abortion in a car; Barshi Taluka Police take action


बार्शी विशेष : क्रेटा कारमध्ये विनापरवाना बेकायदेशीर गर्भलिंग निदान करुन गर्भपात करणाऱ्या एका व्यक्तीस बार्शी तालुका पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. ७ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेपाचचे सुमारास जामगाव (आ) शिवारात ही कारवाई करण्यात आली. अजित सुरेश मस्तूद (वय ३६) रा. रोपळे, ता. माढा असे ताब्यात घेतलेल्या नाव आहे.

बार्शी तालुक्यातील वानेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस, जामगाव (आ) शिवारातील समाधान बाबर यांच्या पडीक शेतातील कच्च्या रस्त्यावर केलेल्या कारवाईत क्रेटा कार (क्र. एमएच४५-एझेड-२१६६) मध्ये सोनोग्राफी मशीन व गर्भपात करण्यासाठी लागणारी औषधे, गोळ्या, इंजेक्शन आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी कारसह सर्व साहित्य जप्त केले. परवाना नसताना गर्भलिंग निदान करुन गोळ्या औषधे देऊन गर्भपात करत असल्याचे अजित मस्तूद याने सांगितले. 

बार्शी ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अजित सुरेश मस्तूद याचेविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानोपयोगी तंत्र (गर्भलिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४ कलम ३(अ), १८ व २३ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)