बार्शीतून हरविलेला अल्पवयीन मुलगा कुटुंबियांच्या स्वाधीन

Admin
0

 

Minor boy missing from Barshi handed over to family

Minor boy missing from Barshi handed over to family


बार्शी विशेष : घरात कोणासही काही न बोलता निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाचा तत्परतेने शोध घेऊन शहर पोलिसांनी त्याला पालकांच्या स्वाधीन केले.


याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील टिळक चौक येथे राहणारा श्रेयस दशरथ चव्हाण (वय १३) हा मुलगा २ जानेवारी रोजी घरात कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला होता.


प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोनि बालाजी कुकडे यांनी तपासी अधिकारी सपोनि झालटे व गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील हवालदार ठोंगे, पोकॉ राहुल उदार, बाळकृष्ण मुठाळ, सतीश उघडे यांनी बार्शी बस स्थानक, कुर्डुवाडी बस स्थानक तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, सदर मुलगा पुणे येथे गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला पुण्यातून शोधून आणून पालकंच्या स्वाधीन केले. 


शहर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मुलगा सुखरुप मिळाल्याबद्दल त्याच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)