Update about the rain in Barshi taluka
बार्शी विशेष : कुठे आले पाणी? कुठले रस्ते आहेत बंद? जाणून घ्या बार्शी तालुक्यातील पावसाविषयी अपडेट.
- मौजे भोईंजे ते श्रीपत पिंपरी ओढ्याला पूर आलेला असून वाहतुक बंद आहे.
- मौजे साकत निलकंठा नदीला पूर आल्यामुळे सर्व नदीकाठच्या शेतकऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
- मौजे सर्जापूर येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसाने गैबी साठे यांच्या घरात पाणी शिरूर नुकसान झाले आहे.
- मुंगशी वा नागझरी नदीला महापूर आल्यामुळे मुंगशी ते कौठाळी रस्ता बंद आहे.
- मौजे,कासारवाडी येथील बळीराजा हॉटेल पाण्यात.
- मौजे पिंपळगाव (पान) येथील नीलकंठा नदीला महापूर आल्याने जुने दत्त मंदिर परिसर व तेथील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. तेथील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे त्याचप्रमाणे आपापले पशुधन दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सांगितले आहे.
- मौजे इर्ले येथैल भोगावती नदीला पूर आलेला आहे. वाहतूक चालू आहे, ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- मौजे बोरगाव (झाडी) ते झरेगांव व बोरगांव (झाडी) ते उपळे (दुमाला) रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.
- उपळे दु येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसाने खंडू महादेव कसबे यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले.
- मौजे जोतिबाचीवाडी येथे रात्रीच्या पावसाने जवळगांव मध्यम प्रकल्पांतून अनियंत्रित विसर्गामुळे जोतिबाचीवाडी ते अंबाबाईवाडी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद केलेला आहे.
- अंबाबाईचीवाडी ते जोतिबाचिवाडी जाणारा रस्ता बंद केलेला आहे.
- पिंपळगांव धस येथे महापूर.
- काळेगांव मध्ये भरपूर पाऊस झालेला आहे. तसेच भोगावती नदीवर काळेगाव-उंडेगाव बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. नदीला महापूर आलेला आहे. भोगावतीने नदीने रौद्ररूप धारण केलेले आहे. पूर्णपणे रस्ता बंद केलेला आहे. तसेच नागरिकांना जागृत राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. लहान मुलांना नदीकडे जाऊ देऊ नये, स्वतःबरोबर इतरांची पण काळजी घ्या अशा सूचना दिल्या आहेत. कोणाला काही अडचण असल्यास पोलीस पाटील किंवा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.
- मौजे पिंपळगाव (पान) येथील नीलकंठ नदीला महापूर आल्याने गावातील जुने दत्त मंदिर इथपर्यंत पुराचे पाणी आले आहे. गावातील सर्व नागरिकांना सतर्क करण्यात आलेले आहे. पशुधनाची काळजी घेण्यास सांगितले आहे.
- मौजे पिंपळगाव (पान) येथून जाणारा साकत पानगांव नीलकंठ नदीच्या महापुरामुळे पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. तरी या मार्गावरून कोणीही येण्याचा प्रयत्न करू नये.
- खडकलगांव येथे एक शेतकरी रामभाऊ दगडू करडे हे पाण्यात अडकलेले आहेत त्यांच्या चारही बाजूने पाणी वाहत आहे. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
- मौजे हळदुगे येथील वैराग उपळे रस्ता ओढ्याला पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
- मौजे येळंब चिखर्डे रोडवर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे.
- मालवंडी ते बार्शी व मालवंडी ते माढा रस्ता बंद आहे.
- सुर्डी -बार्शी रस्ता पूर्णपणे संपर्क तुटला आहे.
- मौजे कांदलगाव येथे चांदणी नदीचे पाणी गावात शिरले असून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा येथे पाणी आले आहे.
- मौजे देवगांव मध्ये नदीचे पाणी घरामध्ये शिरले असून संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी शिरले आहे.
- मौजे मुंगशी वा दहिटणे नागझरी नदीला पूर आलेला आहे.
- आगळगांव येथील नदीला पूर आल्यामुळे बार्शी-आगळगांव वाहतूक बंद.
- यावली ते वैराग संपर्क तुटला आहे. यावली गावाजवळ असलेल्या ओढ्याला पाणी आलेले आहे.
- खडकलगाव येथे अग्निशमन दल आले आहे.
- श्रीपत पिंपरी येथे भिंत कोसळल्यामुळे दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.
- सुर्डी मंदिराच्या पाठीमागच्या रस्त्यावर पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सुर्डी ते रस्तापूर रस्त्यावरून कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये.
- बार्शी कासारवाडी रस्त्यावरील वाहतूक बंद आहे .
- पिंपळगाव (पान) येथील नीलकंठ नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या वस्तीमध्ये पाणी शिरले आहे. इतर पशुधन व मानवी जीवित हानी झालेली नाही.
- वैराग धाराशिव रस्त्यावरील मालेगाव (आर) येथील पुलाचा भाग कालच्या पावसाने वाहून गेला आहे.
- जामगाव (आ) ता. बार्शी येथे झालेल्या अति पावसामुळे अशोक हरिचंद्र मूकटे यांच्या घराची भिंत कोसळली आहे.