बार्शी विशेष : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी बार्शीतील सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत डॉ. संजय श्रीधर अंधारे यांना नोटीस दिली आहे. तक्रारदार संदीप चतुर्भुज सुतार यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही नोटीस देण्यात आली आहे.
या नोटीसीमधून डॉ. अंधारे यांना, रुग्णांच्या हितासाठी आवश्यक असणारे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर न करणे आणि जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीचे अग्निशमक प्रमाणपत्र सादर न करणे यावर खुलासा करण्यास सांगितले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट याचिका क्र. ३०४८४/२०२४ बाबतची सद्यस्थिती सादर करण्यास सांगितले आहे.
डॉ. संजय अंधारे यांनी या सर्व बाबींचा खुलासा योग्य त्या सबळ पुराव्यानिशी सात दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले असून, समर्पक खुलासा विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास, बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ चे कलम ५ अन्वये सुश्रुत हॉस्पिटलचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
