वीजेच्या लपंडावाला बार्शीकर वैतागले; महावितरणच्या कार्यपध्दतीबाबत ग्राहकांत असंतोष

0

 

Growing Consumer Dissatisfaction Over MSEDCL’s Working Style
Barshi Vishesh Digital Newspaper

बार्शी विशेष : कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक लाईट जाण्याच्या सततच्या कटकटीला बार्शीकर वैतागले आहेत. 


बुधवार ६ मे २०२६ रोजी बार्शी शहरातील वीजपुरवठा आठ तासांहून अधिक काळ खंडित झाल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. सलग आठ तासापेक्षा अधिक वेळ वीजपुरवठा बंद राहिल्यामुळे या प्रकाराची जास्त चर्चा झाली. 


परंतु शहराच्या काही परिसरात तर दिवसा, रात्री-अपरात्री अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार नित्याचाच आहे. 


यामुळे आणि  विशेषतः रात्री अचानक लाईट गेल्यानंतर  होणारा अंधार, उन्हाळ्यामुळे असह्य होत असलेला प्रचंड उकाडा आणि डासांचा हल्ला यामुळे अबालवृध्द नागरिक हैराण झाले आहेत. 


नेहमीच होत असलेल्या प्रकाराला नागरिक वैतागले असले तरी, सततच लाईट जात असल्यामुळे तक्रारी तरी किती वेळेस करायच्या असा प्रश्न आहे. 


शहराच्या कोणत्या भागात कितीवेळा वीजपुरवठा खंडित झाला होता याची माहिती 'महावितरण'नेच दररोज नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करावी म्हणजे सत्य समजून येईल.


यासोबत महावितरणच्या कारभाराबाबत ग्राहकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत, नविन कनेक्शनसाठी पैसे भरुनही कनेक्शन देण्यास जाणीवपूर्वक उशीर करणे, सर्व्हिस वायर ग्राहकांना आणायला सांगणे, प्रिंटर बंद असल्याचे सांगून पावती देण्यास टाळाटाळ करणे, कर्मचाऱ्यांकडून नीट उत्तरे न मिळणे अशा कार्यपध्दतीमुळे महावितरणबाबत ग्राहकांत नाराजी आहे.



ग्राहकांच्या काही तक्रारी :

  • वीजपुरवठा सुरु झालेला नसतानाही तक्रारी निकाली काढल्याचे मेसेज पाठविले जातात. 
  • काही तक्रारींना महावितरणकडून लवकर उत्तर दिले जात नाही.
  • विद्युतपुरवठा बंद ठेवण्याबाबत पूर्वसूचना देण्याची पध्दत बंद करण्यात आली आहे.
  • मीटर रीडींगच्या तारखेबाबत पूर्वसूचना देण्याची पध्दत बंद केली आहे.
  • बऱ्याच ठिकाणी मीटर रीडींग घेण्यासाठी रीडर येत नाहीत, मीटर रीडींगचा फोटो बिलात प्रिंट केला जात नाही त्यामुळे बिलाच्या पारदर्शकतेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
  • ग्राहकांनी स्वतः फोटो मीटर रीडींग सबमीट केले तरी त्यापेक्षा जास्त युनिटचे बील देण्यात येते. अशावेळी १००, ३००, ५०० युनिटचा टप्पा पार झाल्यास जादा दराने आलेल्या वीज बिलाचा दणका ग्राहकांना बसतो.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)