बार्शी शहरातून पोलिसांचा रुट मार्च (Root March)

0

Police Route March Through Barshi City


बार्शी विशेष : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रविवारी दि.१२ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथ संचलन आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 'दंगा काबू योजना' (Riot Control Drill) राबविण्यात आली.


शिवसृष्टी, संविधान चौक, भीम नगर व सिद्धार्थ नगर, हांडे गल्ली, कोर्ट चौक व तानाजी चौक, शिवसृष्टी या मार्गावरून हे पथसंचलन करण्यात आले.


जयंती उत्सव शांततेत पार पडावा आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने राबवलेल्या या मोहिमेत ६ पोलीस अधिकारी, २३ अंमलदार, ३४ होमगार्ड अशा एकूण ६३ जणांनी संचलन आणि प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.


तसेच यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दंगा काबू योजनाही (Riot Control Drill) राबविण्यात आली. 


आगामी जयंती उत्सवाच्या काळात शहरात शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)