बार्शीच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघाची आंबेडकरांना अनोखी आदरांजली; बाटलीबंद पाणी वाटपाचे सर्वत्र कौतुक

0

पुतळा पार्क येथील पाणी वाटप उपक्रमस्थळी मान्यवरांची उपस्थिती


बार्शी विशेष : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरातील पुतळा पार्क येथे 'डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशन' ने  बाटलीबंद थंडगार पाण्याचे वाटप करून बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी रखरखत्या उन्हात येणाऱ्या भीम अनुयायांना पिण्यासाठी शुध्द, स्वच्छ, शीतल जल मिळावे, या हेतूने संघटनेने बाटलीबंद थंड पाण्याचे वाटप करण्याचा उपक्रम केला. या पध्दतीचा उपक्रम याठिकाणी प्रथमच आयोजित केल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.


पुतळा पार्क येथील पाणी वाटप उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले तसेच महायुतीचे नगरसेवक उपस्थित होते.


बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनीही महाआघाडीतील नगरसेवक व नगरसेविकांसह याठिकाणी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बोलताना आमदार सोपल म्हणाले, चौथ्या स्तंभाने असे समाजोपयोगी उपक्रम अखंडितपणे राबवावेत. पाणी वाटपाचा घेतलेला वसा अविरत सुरू ठेवावा. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिस बांधव आणि भगिनी यांनीही उपक्रमाचे ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले.


याप्रसंगी संघटनेचे सोलापूर जिल्हा पश्चिम अध्यक्ष विनोद ननवरे, उपाध्यक्ष विजय कोरे, खजिनदार अजय पाटील तसेच बार्शी शहर व ग्रामीण पदाधिकारी गणेश शिंदे, संतोष कानगुडे, अभिजीत शिंदे, निलेश उबाळे, समाधान विधाते, विश्वनाथ सोनवणे आणि महिला आघाडी प्रमुख राजश्री गवळी आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)