Barshi Vishesh Digital Newspaer 11 April 2026
बार्शी विशेष : पत्रकारांच्या हक्क, हित रक्षणासाठी कार्यरत असलेल्या 'अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद' या अग्रगण्य संस्थेच्या 'डिजीटल विंग' चा कार्यक्षेत्र विस्तार बार्शीमध्ये करण्यात आला.
संघटनेचे सोलापूर जिल्हा (पश्चिम) अध्यक्ष विनोद ननवरे, उपाध्यक्ष विजय कोरे, सचिव संजय बोकेफोडे, सहसचिव बाबासाहेब शिंदे, खजिनदार अजय पाटील यांचे उपस्थितीत, बार्शी तालुका 'डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन' चा कार्यारंभ झाला.
यावेळी बार्शी शहर व तालुक्यासाठी कार्यकारिणी जाहीर करुन पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र देण्यात आले.
बार्शी शहर कार्यकारिणी: गणेश शिंदे (अध्यक्ष), अभिजीत शिंदे (उपाध्यक्ष), निलेश उबाळे (सचिव), अमीन गोरे (सहसचिव), समाधान विधाते (खजिनदार), स्वप्निल पोफळे, सचिन साळवे, संदीप सुतार (सदस्य), रमेश गायकवाड व रमण कारंजकर (मार्गदर्शक), शंकर ननवरे (कायदेशीर सल्लागार)
बार्शी ग्रामीण कार्यकारिणी : संतोष कानगुडे (अध्यक्ष), काशिनाथ शिरसागर (उपाध्यक्ष), विश्वनाथ सोनवणे (सचिव), राजेश भोगे (सहसचिव), बालाजी देवकते (खजिनदार), शांतीलाल काशीद, अर्जुन गोडगे (सदस्य), राजश्री गवळी (महिला आघाडी प्रमुख)
संघटन, समन्वय आणि सहकार्य यानुसार पत्रकारांचे हित व हक्क रक्षणासाठी संघटना काम करेल असे यावेळी झालेल्या चर्चेतून स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश उबाळे यांनी केले, तर अभिजीत शिंदे यांनी आभार मानले.
