स्कार्पिओच्या धडकेमुळे वृध्द दुचाकीस्वाराचा मृत्यु

Admin
0

 

Elderly biker dies due to collision with Scorpio
An Ai Image
Elderly biker dies due to collision with Scorpio

बार्शी विशेष : स्कार्पिओने दिलेल्या धडकेमुळे वृध्द दुचाकीस्वाराच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. दत्तात्रय बलभीम मुकटे (वय ६५) रा. कांदलगाव, ता. बार्शी असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बार्शी बायपास रस्त्यावरील नागोबावाडी चौकात ३१ डिसेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.


मयत व्यक्तीचे भाऊ रामलिंग बलभीम मुकटे, रा. कांदलगाव, ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी व माझा पुतण्या तानाजी पोपट मुकटे ३१ डिसेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास माझ्या मोटरसायकलवरुन बार्शीकडून कांदलगावकडे जात होतो, त्यावेळी टीव्हीएस लूना (क्र. एमएच१३-डीएच-४००६) वरुन माझा भाऊ दत्तात्रय बलभीम मुकटे आमच्यापुढे काही अंतरावरुन जात होता. 


आम्ही बार्शी बायपास रस्त्यावर नागोबावाडी चौकात आलो असता, कुर्डुवाडीकडून आलेल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओने (क्र. एमएच-४४-एई-९८८८) माझ्या भावाच्या दुचाकीस समोरुन धडक दिली. खाली पडून माझ्या भावाच्या डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी झाला. आम्ही त्याला बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी करुन तो मयत झाल्याचे सांगितले.


बार्शी तालुका पोलिस ठाण्यात स्कार्पिओ चालक पुंडलिक पांडुरंग काळे, रा. बीड याचे विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास हवालदार रुपेश शेलार करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)