Organization of floodlight mat Kabaddi tournament in Barshi
बार्शी विशेष : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त बार्शीतील बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज येथे ५ ते ७ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष गट मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत, जय भारत स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर, स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर, छावा क्रीडा मंडळ, कोल्हापूर, जय मातृभूमी क्रीडा मंडळ, सांगली, शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ, परांडा, श्रीराम क्रीडा मंडळ, सोलापूर, श्री श्रीकृष्ण क्रीडा मंडळ, सोलापूर व राकेश भाऊ घुले कबड्डी संघ, पुणे हे संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेत विजेत्या होणाऱ्या संघास ३१ हजार, द्वितीय क्रमांकास २१ हजार तर तृतीय क्रमांकास ११ हजार रुपये रोख व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय करंडे यांनी दिली.
