Various activities organized on the occasion of Maharashtra Police Raising Day
बार्शी विशेष : 'महाराष्ट्र पोलिस दल रायझिंग डे' निमित्त बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने २ ते ८ जानेवारी दरम्यान नागरिकांत कायद्याबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्र, सामाजिक संवाद असे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिवाजी महाविद्यालय येथे कबड्डी स्पर्धा, अतिरेकी हल्ला प्रात्यक्षिक, वाहतुक सुरक्षेबाबत जनजागृती व सायबर गुन्ह्यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती पोनि बालाजी कुकडे यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत २ जानेवारी रोजी बार्शीतील साधना कन्या प्रशालेतील विद्यार्थीनींना पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाज, विविध शस्त्रांची माहिती, नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे, महिला पोलिस उपनिरिक्षक सोनम जगताप, पोलिस अधिकारी, कर्मचारी व साधना कन्या प्रशालेतील शिक्षक उपस्थित होते.
