पिस्टल बाळगणाऱ्या इसमास बार्शी तालुका पोलिसांनी केली अटक

Admin
0

 

Barshi taluka police arrested a person who was carrying a pistol

Barshi taluka police arrested a person who was carrying a pistol


बार्शी विशेष : बार्शी तालुका पोलिसांनी कारमध्ये पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एका इसमास पकडले, तर चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. अभिजीत चंद्रकांत जाधव, (रा. गारभवानी नगर झोपडपट्टी, परांडा) असे पकडलेल्या इसमाचे नाव आहे, तर धीरज कांतीलाल पवार, (रा. सावदरवाडी, परांडा) असे पळून गेलेल्या इसमाचे नाव आहे. २९ डिसेंबरच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

दोन इसम पांढऱ्या रंगाच्या कारमधून (क्र. एमएच०८-झेड-७४७५) बार्शी देवगांव मार्गे भूमकडे जाणार असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती सपोनि दिलीप ढेरे यांना मिळाली. पोलिस पथकांसह ते गाडेगांव रोडवरील साई संजीवनी हॉस्पीटलजवळ आले असता, सदर क्रमांकाची कार भरधाव वेगाने जाताना दिसली. तिचा पाठलाग करत यमाई मंदिरजवळ पोलिसांनी वाहन आडवे लावून ती कार थांबवली.

पोलिसांनी कारमध्ये चालकाशेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेतले, तर कारचालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये पकडलेल्या इसमाकडे एक मोबाईल, कारमध्ये एक मोबाईल, तसेच डॅशबोर्डच्या कप्प्यात देशी बनावटीचे पिस्टल व ३ जीवंत काडतुसे मिळून आली. या कारवाईत दोन मोबाईल, एक पिस्टल, तीन काडतूस व एक कार मिळून ५ लाख ९५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पो.अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पो.अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पो.अधिकारी अशोक सायकर यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलिस ठाणेचे सपोनि दिलीप ढेरे, उपनिरिक्षक बालाजी वळसने, हवालदार सुभाष सुरवसे, खांडेकर, पोकॉ बालाजी हंगे, राहुल बोंदर, गवळी, बचुटे, चिठ्ठलवाड यांनी केली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)