गावठी पिस्तुल व काडतुस बाळगणाऱ्या दोन तरुणांना बार्शीत अटक

Admin
0

 

Two youths arrested in Barshi with a pistol and live rounds

Two youths arrested in Barshi with a pistol and live rounds


बार्शी विशेष : मोटरसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेल्या दोन तरुणांकडून बार्शी शहर पोलिसांनी एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त केली. जैद इस्माईल काझी (वय २२) रा. भाळवणी, ता. पंढरपूर व विक्रांत उर्फ विक्की तुकाराम गोरे (वय २६) रा. दत्त मंदिराजवळ, भाळवणी, ता. पंढरपूर अशी त्यांची नावे आहेत.


६ जानेवारीच्या पहाटे अडीच वाजणेचे सुमारास रात्रगस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला शहरातील भवानी पेठ, सोलापूर रस्ता येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप सांस्कृतिक सभागृहासमोर काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर दोन तरुण संशयास्पद रितीने थांबलेले दिसून आले. पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता, त्यांचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे मिळून आली. त्यांचेकडील होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (क्र. एमएच४५-एजे-६१७९) सह १ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन दोघांना अटक केली. सदर मोटरसायकल ही वेळापूर येथून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली.


बार्शी शहर पोलिस ठाण्यात्यांचे विरोधात भारतीय शस्त्र अधिनयम १९५९ कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर, हवालदार अमोल माने, प्रविण साठे, बाळकृष्ण डबडे, पोकॉ बाळकृष्ण मुठाळ, अंकुश जाधव, अविनाश पवार, राहुल उदार, सचिन देशमुख, सचिन नितनात, इसमिया बहिरे, अजीज शेख, सतीश उघडे, वैभव भांगे व संतोष जाधवर यांनी केली.


नागरिकांना जर अवैध शस्त्रे किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्यांनी त्वरित पोलिस ठाणे येथे अथवा ११२ क्रमांकावर माहिती द्यावी, दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. शहराची सुरक्षितता वाढविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)