Municipal council election is difficult for voters due to the change in the polling station
बार्शी विशेष : बार्शी नगरपरिषदेच्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी शहरातील मतदारांना आता पूर्वीपेक्षा लांब अंतरावर व नविन ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. या नविन बदलामुळे मतदारांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
लोकसभा तसेच विधानसभेसाठी मागील वेळी मतदान केलेल्या मतदान केंद्रापेक्षा यावेळेस बदलेले मतदान केंद्र हे अधिक जास्त अंतरावर आणि नविन ठिकाणी असल्यामुळे, मतदारांची गैरसोय होणार आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग मतदारांना याचा अधिक त्रास होणार आहे.
मतदारांची गैरसोय होईल असे मतदान केंद्र देण्याचा निर्णय प्रशासनाने का व कशासाठी घेतला याबाबत मतदारांतून आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.
मतदान केंद्रावरील मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदानाची तारीख, वेळ, ठिकाण इत्यादीं माहिती असलेल्या मतदार चिठ्ठ्या बीएलओकडून घरपोच मिळत नाहीत अश्या अनेक मतदारांच्या तक्रारी आहेत.
