बार्शी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

Admin
0

 

Preventive action by the police in the wake of municipal council elections

Preventive action by the police in the wake of municipal council elections


बार्शी विशेष : बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक शांततेने पार पडावी यासाठी बार्शी शहर पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमानुसार १२ व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार २१ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३ नुसार सातत्याने दारू विकणाऱ्या २० जणांकडून उपविभागीय दंडाधिकारी यांचे समक्ष अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये शहरातील मागील पाच वर्षात ज्यांच्यावर शरीराविरूध्द गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर भा.न्या.सं. कलम १२६ प्रमाणे ४५३, भा.न्या.सं. कलम १२९ प्रमाणे १५ इसमांवर कारवाई करण्यात आली.

बार्शीतील १) युन्नुस रज्जाक सय्यद, रा. मांगडे चाळ, २) अक्षय पप्पू भवळ, रा. लहुजी चौक, ३) ओंकार उर्फ तुळ्या किशन पेठाडे, रा. टिळक चौक, ४) राजेंद्र भगवान गायकवाड, रा. १६९० लहुजी चौक (सर्व रा. बार्शी) यांना उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर यांनी पुढील सहा महिन्याकरीता सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

मतदान शांततेत पार पडावे यासाठी शहरातील ४७ इसमांना दि. २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ या ६ दिवसांसाठी बार्शी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या सर्व हद्दपार इसमांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

मतदान प्रक्रिया शांततेने पार पडावी यासाठी नागरिकांनी भांडण-तंटा करु नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)