111 people participated in blood donation camp in police station
बार्शी विशेष : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना व बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रध्दांजली वाहण्याकरिता संविधान दिनाचे औचित्य साधून बार्शी पोलीसांच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे यांचे उपस्थितीत करण्यात आले.
शिबीरात एकूण १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
