CCTV was also stolen along with the motorcycle
बार्शी विशेष : घराच्या गेटच्या आत लावलेली मोटरसायकल आणि सीसीटीव्ही चोरीला गेल्याची फिर्याद सेवानिवृत्त शिक्षक पोपट कृष्णा लोंढे (वय ७०) रा. ब्रम्हदेव बँकेच्या मागे, अलिपूर रस्ता, बार्शी यांनी शहर पोलिसात दिली आहे.
२३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ चे सुमारास होंडा शाईन मोटरसायकल (क्र. एमएच१३-बीजे-६१०७) घराच्या गेटच्या आत लावली होती. रात्री दीडचे वाजता लघुशंकेसाठी घराबाहेर आल्यानंतर पाहिले असता, मोटरसायकल आणि घराबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरीला गेल्याचे दिसून आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
बार्शी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
.jpg)