प्रातिनिधीक चित्र
Theft of material from hotel with CCTV camera
बार्शी विशेष : बार्शी अलिपूर जवळ असलेल्या हॉटेलच्या शटरचा कोयंडा कुलूप तोडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह ३१ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले. उमेश राजाराम माने (वय ३५) रा. अलीपूर, ता. बार्शी यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माने यांचे बार्शी लातूर रस्त्यावर पोतदार स्कूलसमोर पत्राशेड मध्ये माने बंधू नावाने हॉटेल असून, २६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करुन ते घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ चे सुमारास हॉटेल उघडे असल्याचा त्यांच्या भावाच्या मोबाईलवर फोन आल्यामुळे, भावासह ते हॉटेलकडे गेले. त्यावेळी शटरचा कुलूप कोयंडा तोडून शटर अर्धवट उघलेले आणि आतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
आत जाऊन पाहणी केल्यानंतर, हॉटेलमधील १ गॅस शेगडी, ३ गॅस सिलेंडर, ३ सीसीटीव्ही कॅमेरे, दूध, कोल्ड्रिंक्स व पाणी बाटल्यांचे बॉक्स, बेसन, तेल, फरसाण, बिस्कीटे आदी खाद्यपदार्थ व रोख २ हजार रुपये मिळून ३१ हजार ५५० रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. मोबाईलमधील सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर पहाटे ४.३८ ते ४.५१ चे दरम्यान ही चोरी झाल्याचे समजले.
