Camp for VJNT tribe in Barshi taluka, road court and Gram Sabha
बार्शी विशेष : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत बार्शी तालुक्यात व्हीजेएनटी जमातीसाठी शिबीर, गावांत ग्रामसभांचे आयोजन तसेच रस्ता अदालत यांचे आयोजन करण्यात आले आहे.
व्हीजेएनटी साठी शिबीर
या अभियानांतर्गत बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत बार्शी तालुक्यातील सर्व गावांमध्ये गावस्तरावर ग्रामसभेत व्हीजेएनटी जमातीसाठी आपले सरकार सेवा केंद्रामधील महसूली दाखले, उत्पन्न प्रमापत्र, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत.
ग्रामसभांचे आयोजन
बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सातबारा वाचन, रस्त्यासंदर्भातील शासन निर्णय वाचन, सेवा पंधरवाडा विषयी माहिती, गाव नकाशावरील माहिती, संजय गांधी लाभार्थी योजनेतील मयत लाभार्थी व डी.बी.टी. न झालेले लाभार्थी याची माहिती शोधणे आणि सर्व योजना वाचून समजावून सांगणे या उपक्रमांचा समावेश आहे.
रस्ता अदालत
तसेच गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० ते ३ या कालावधीत बार्शी तहसिल कार्यालयात रस्ता अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. तडजोड होण्यायोग्य महसूल विषयक प्रकरणांसह वादी व प्रतिवादीसह विधीज्ञांनी उपस्थित रहावे असे तहसिल कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.