Dolby system and laser light used in public processions banned in Solapur District
बार्शी विशेष (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
गणेशोत्सवातील मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या डॉल्बी सिस्टीममुळे काही व्यक्तींना कान व छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व व जिवितास धोका निर्माण झाल्याच्या, तसेच लेझर लाईट मुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम झाल्याच्या घटनाकडे लक्ष वेधत जेष्ठ नागरिक संघटनांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिले होते.
यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मिरवणुकींमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध केल्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद केले आहे.