जप्त केलेल्या गांजा प्रकरणी सखोल तपास सुरु : पो. अधिक्षक अतुल कुलकर्णी

Admin
0

 

A thorough investigation into the seized marijuana case: Police Superintendent Atul Kulkarni

A thorough investigation into the seized marijuana case: Police Superintendent Atul Kulkarni


बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील भोयरे शिवारात जप्त करण्यात आलेला गांजा कोठून आणला जात होता, कुठे नेला जात होता, त्यामध्ये कितीजण सहभागी आहेत, स्थानिकांचा सहभाग आहे का, कधीपासून हा प्रकार सुरु होता याचा सखोल तपास सुरु आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गांजाची वाहतूक होणार असल्याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप ढेरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी आगळगांव बार्शी रस्त्यावर भोयरे शिवारात सापळा रचून ६९२ किलो गांजा, वाहतूक करणारा ट्रक (क्र. एमएच-४३-वाय-८९४७), टेम्पो (क्र. एमएच-१४-ईएम-९८३३) आणि कार (क्र. एमएच-१४-ईसी-४५३६) मिळून १ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच पळून जाणारा टेम्पो चालक अंकुश दशरथ बांगर, रा. भोयरे, ता. बार्शी यांस अटक केली होती.

यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढील तपास करण्यासाठी चार पथके तयार केली असून, अटक केलेल्या आरोपीस सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी दुसऱ्या ट्रक चालकांसही ताब्यात घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली.

सदर पत्रकार परिषदेस अतुल कुलकर्णी यांच्यासह उप विभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, बार्शी शहर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, तालुका पोलिस सपोनि दिलीप ढेरे आदी उपस्थित होते.

बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असून, सदर कारवाई पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक प्रीतम यावलकर, उप विभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, बार्शी शहर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, तालुका पोलिस सपोनि दिलीप ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि बालाजी वळसणे, हवालदार धनराज केकाण, अभय उंदरे, अरुण डुकळे, तानाजी डाके, पोना सागर शेंडगे, पोकॉ सिध्देश्वर लोंढे, युवराज गायकवाड, राहुल बोंदर, उत्तरेश्वर जाधव, मंगेश बोधले, शैलेश शिंदे, ओमप्रकाश दासरे, लोकरे, धनराज फत्तेपुरे, अविनाश पवार, वैभव भांगे, रतन जाधव, राहुल उदार, सुनिल सरडे, रमेश माने, पटेल, चालक एएसआय केशव माशाळ, लक्ष्मण चिट्टलवाड, वैभव माळी यांनी पार पाडली.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)