श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन; नियोजनासाठी सोलापूर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी

Admin
0

 

Shri Sant Namdev Maharaj National Integration Vishwa Mahasammelan Selection of office bearers in Solapur district for planning

Shri Sant Namdev Maharaj National Integration Vishwa Mahasammelan; Selection of office bearers in Solapur district for planning

बार्शी विशेष : जानेवारी २०२६ मध्ये नाशिक येथे होणारे आगामी 'संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन' यशस्वीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा नामदेव शिंपी समाजातील महिलांच्या जिल्हा, तालुका स्तरावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्हा जनसंपर्क प्रमुख सौ. सोनाली गणेश पिसे (करमाळा), जिल्हा उपाध्यक्षा सौ. मनीषा प्रवीण ढवळे (अकलूज), जिल्हा सहसचिव सौ.  धनश्री पांडुरंग मुळे (अकलूज), तालुका अध्यक्षा सौ. ऋतुजा रोहित सरवदे (बार्शी), बार्शी तालुका उपाध्यक्षा रूपाली धनंजय फटाले (बार्शी), बार्शी तालुका कार्याध्यक्षा सौ. अंकिता अंबादास कारंजकर (बार्शी) नातेपुते तालुका उपाध्यक्षा सौ. हेमा संजय ढवळे (नातेपुते) या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

या निवडीप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. मिनलताई कुडाळकर, पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री. संतोष मुळे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शारदा जवंजाळ (मामी), पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक प्रमुख सौ. सुचिता महाडीक, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. चंद्रकांत चुंबळकर, महिला अध्यक्षा सौ. हेमलाता चांडोले, जनसंपर्क प्रमुख श्री. अरुण मामा लंगडे, शहर अध्यक्ष श्री. संजय होमकर, शहर महिला अध्यक्षा सौ. संगीता मिरजकर व समाजातील बंधू, भगिनी उपस्थित होते.

श्री. भास्करभाऊ टोंपे, श्री. ईश्वर भाऊ धिरडे, श्री. अनंतभाऊ जांगजोड व उषाताई पोरे, श्री. संजय नेवासकर, श्री. महेश मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. 

श्री संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि समाजाचे संघटन बळ वाढवण्यासाठी या नियुक्त्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सदर निवडींचे सर्वत्र स्वागत होत असून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. आगामी महासंमेलन अधिक भव्य व प्रभावीपणे यशस्वी करण्याच्या दृष्टीने समाजात उत्साहाचे वातावरण आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)