पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध दाम्पत्याकडील सोन्याचे दागिने लंपास

Admin
0

 

pretending to be a cop; Jewellery stolen from elderly couple

pretending to be a cop; Jewellery stolen from elderly couple


बार्शी विशेष : मोटरसायकलवरुन आलेल्या दोन इसमांनी पोलिस असल्याची बतावणी करुन वृद्ध दाम्पत्याकडील ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले. ही घटना दि. २० जून रोजी सकाळी साडेअकराचे सुमारास जामगांव बाह्यवळण रस्त्यावर घडली. लष्करातून सेवानिवृत्त झालेले शंकर जनार्धन कुलकर्णी (वय ७०) रा. भिसे प्लॉट, सुभाष नगर, बार्शी यांनी या घटनेची बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धानोरे येथील यमाई देवीचे दर्शन करुन फिर्यादी त्यांच्या पत्नीसह टीव्हीएस दुचाकीवरुन बार्शीकडे परत येत होते.  जामगांव येथील स्वराज्य हॉटेलजवळ ते आले असताना, त्यांचे पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांना थांबवून, आम्ही पोलीस आहोत, पुढे चेकिंग सुरू असून तुम्हाला पाच हजार दंड होईल. तुमच्याकडील दागिने पिशवीत काढून ठेवा असे सांगितले. 

त्यामुळे फिर्यादीच्या पत्नीने हातातील तीन तोळे सोन्याच्या दोन पाटल्या व चार ग्रॅमची सोन्याची अंगठी त्या इसामांनी दिलेल्या कागदात ठेवली. त्याचवेळी हातचलाखीने कागदी पुडीची अदलाबदल करुन त्या इसमांनी बनावट बांगड्या असलेली पुडी फिर्यादीस दिली आणि ते निघून गेले. नंतर फिर्यादीने पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये बनावट बांगड्या दिसून आल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)