बार्शी लातूर रोडवरील कला केंद्रावर पोलिसांची धाड; ५० लाखांचे साहित्य जप्त, ७२ जणांवर गुन्हे दाखल

Admin
0

बार्शी लातूर रोडवरील कला केंद्रावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपी
पोलिस कारवाईचे प्रातिनिधिक चित्र


बार्शी विशेष : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून बार्शी-लातूर रोडवर रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या कला केंद्रावर बार्शी तालुका पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत ५० लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, ७२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई २४ मे २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून बार्शी-लातूर रोडवरील 'लवंगी मिरची' कला केंद्र रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईदरम्यान कला केंद्रामध्ये नृत्य करणाऱ्या नृत्यांगना, ग्राहक, चालक आणि मालक अशा एकूण ७२ लोकांवर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पोलिसांनी या ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच देशी दारूच्या बाटल्या असा एकूण ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि महेश ए. माने, उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव, चंद्रकांत घोळवे आणि पोलीस अंमलदार धनराज केकाण, डुकळे, स्वाती काटे, राहुल बोंदर, बिरकले, कांबळे, चौधरी, चालक खराडे यांच्या पथकाने केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)