ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून बार्शी पोलिसांचा गौरव

Admin
0

 

Drug racket busted; Special Inspector General of Police felicitates Barshi police
Drug racket busted; Special Inspector General of Police felicitates Barshi police


बार्शी विशेष : बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट उघडकीस आणण्यासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेकडून बार्शी शहर पोलीस ठाण्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


बार्शी-परांडा परिसरात अंमली पदार्थ विक्री होत असल्याबाबत बार्शी शहर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या विशेष पथकाने परांडा रोड पेट्रोलपंपाजवळ केलेल्या कारवाईत तीन आरोपींकडून, मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, १ गावठी पिस्टल, ३ जिवंत राऊंड, मोबाईल हँडसेट्स, वजन काटा, रोख रक्कम व टोयोटा कार असा मुद्देमाल जप्त केला. 


याप्रकरणी केलेल्या पुढील तपासात निष्पन्न झालेल्या १३ पैकी १० आरोपींना अटक करुन त्यांचेकडून सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींविरोधात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यान्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.


या उत्कृष्ट, नियोजनबध्द व सुसंगत तपास कार्यवाहीची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांचेकडून बार्शी शहर पोलीस ठाण्यास ‘प्रशस्ती पत्रक’ प्रदान करून गौरविण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)