| खामगाव : हिंसक प्राण्याच्या हल्ल्यात १८ शेळ्या ठार |
बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील खामगांव येथे असलेल्या शिवाजी कात्रे यांच्या शेळीपालन केंद्रावर काल रात्री हिंसक प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात १८ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती वनविभाग आणि बार्शी तहसील कार्यालयाला कळविण्यात आली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्ला करणारा हिंसक प्राणी कोणता याबद्दल तर्कवितर्क सुरु आहेत.
