पोलिस असल्याची बतावणी करुन दागिने लुटणारी टोळी सक्रिय

Admin
0

 

A gang is active in robbing jewellery, posing as policemen

A gang is active in robbing jewellery, posing as policemen


बार्शी विशेष :  पोलिस असल्याचे सांगून महिलेच्या गळ्यातील १२ ग्रॅम सोन्याचे गंठण लंपास केल्याचा आणखीन एक प्रकार बाह्यवळण रस्त्यावर घडला. याबाबत मनिषा हनुमंत भिवरकर (वय ४०) रा. जामगांव (आ), ता. बार्शी यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २२ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मुलगी आदितीसह त्या माऊली नर्सरीतून रोपे घेऊन येत असताना, पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेल्या दोन इसमांनी त्यांना थांबवून, देवीच्या मंदिराजवळ एका महिलेचे दागिने चोरीला गेले आहेत, आम्ही पोलिस आहोत, तपासणीसाठी तुमच्याकडील दागिने दाखवा. असे म्हणून आदितीच्या गळ्यातील १२ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण घेतले व रेकॉर्डला एन्ट्री करावी लागते असे सांगत एका पांढऱ्या कागदात पुडी बांधल्याचे भासविले. आणि हातचलाखीने पुडीची अदलाबदल करून बनावट दागिन्याची पुडी देऊन तेथून निघून गेले.

पोलिस असल्याची बतावणी करुन दोन दिवसांपूर्वीच जामगांव बाह्यवळण रस्त्यावर वृध्द दांपत्याकडील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना ताजी असतानाच, आणखीन दुसरी घटना घडल्यामुळे, पोलिस असल्याचे भासवून महिलांकडील सोन्याचे दागिने लुटणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)