मोबाईल चोर सापडले; बियाणे चोर कधी सापडणार?

Admin
0

 

Mobile thieves found; When will the seed thief be found?
Mobile thieves found; When will the seed thief be found?

बार्शी विशेष : हिरेमठ हॉस्पीटलमधून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी काही तासातच गजाआड केले. सुदर्शन राजू डोंगर (वय २४) रा. लोकमान्य चाळ, लातूर रोड, बार्शी व विनायक सतिश देवकर (वय २३) रा. टिळक चौक, बार्शी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पत्नीवर औषधोपचार सुरु असल्याने फिर्यादी महेश अरविंद यादव, रा. सुभाषनगर बार्शी हे हिरेमठ हॉस्पीटल येथील रूम नं. ५ मध्ये झोपले असताना, त्यांनी टेबलवर ठेवलेले तीन मोबाईल पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. १३ जूनच्या पहाटे ही चोरी झाली होती.

मोबाईल चोरीची फिर्याद बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुदर्शन राजू डोंगर यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विनायक सतिश देवकर याच्यासह सदर चोरी केल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांचेकडून १ लाख ४८ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल हस्तगत केले आहेत.

मोबाईल चोर पोलिसांना अवघ्या काही तासातच सापडले ही कौतुकाची बाब असली तरी, बार्शीच्या तेलगिरणी चौकातील सावळे सभागृहाशेजारी असलेल्या खते व बी-बियाणांच्या दुकानातून भरदिवसा चोरी करणारे चोर कधी सापडणार? हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. सात ते आठ चोरट्यांनी ७ जून रोजी या दुकानातून भरदिवसा ८४ हजार रुपये किंमतीचे कांदा बियाणे चोरुन नेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)