बार्शीतून हरवलेला हर्ष पालकांच्या स्वाधीन

Admin
0

 

Harsh, who was lost in Barshi, handed over to his parents

Harsh, who was lost in Barshi, handed over to his parents 


बार्शी विशेष : बार्शीतून हरवलेल्या हर्ष शर्मा या १३ वर्षीय बालकाचा तत्परतेने शोध घेऊन, शहर पोलिसांनी त्यांस त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. 

सायकल खेळण्यासाठी बाहेर गेलेल्या हर्ष शर्मा घरी न परतल्यामुळे व शोध घेऊनही न सापडल्यामुळे पालकांनी त्याचे अपहरण झाल्याच्या संशय व्यक्त करुन शहर पोलिसांत रविवार ८ जून रोजी फिर्याद दिली होती. 

त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तत्काळ चार पोलीस पथके तयार करुन तपासासाठी रवाना केली. सीसीटीव्ही फुटेज तपासणीतून तो बार्शी रेल्वे स्टेशन येथे गेल्याचे दिसून आल्यामुळे तो रेल्वेने बाहेरगावी गेला असण्याची शक्यता गृहीत धरून पोलीसांनी पांगरी, येडशी, रामलिंग, धाराशिव, लातूर याठिकाणी तसेच कुर्डूवाडी, पंढरपूर, कोल्हापूर आणि पुणे येथे तपास पथके रवाना केली होती. तसेच शोधपत्रीका तयार करून जिल्ह्यातील पोलीस ठाणे, रेल्वे पोलीस, बस स्थानके यांचेकडे आणि सोशल मिडीयामध्ये पाठविली होती.

अखेर बार्शी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि हरवलेला हर्ष रेल्वे पोलीसांना पुणे रेल्वे स्टेशनवर मिळून आला. पोलिसांनी त्याला बार्शीत आणून सुखरुपपणे पालकांच्या ताब्यात दिले. 

दरम्यान त्याचे अपहरण झाले नव्हते, तर आई रागावल्यामुळे नाराज होऊन तो घरातून बाहेर जाऊन तो प्रथम कोल्हापूर व नंतर पुणे येथे गेला होता अशी माहिती समोर आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, सपोनि प्रदिप झालटे हवालदार ठोंगे, केकान, घाडगे, पोना मुळे, पोकॉ शहाणे, पवार यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)