१३ वर्षीय बालकाचे बार्शीतून अपहरण

Admin
0

 

13 year old child kidnapped from Barshi

13 year old child kidnapped from Barshi



बार्शी विशेष : सायकल खेळण्यासाठी घरातून बाहेर पडलेला १३ वर्षांचा मुलगा घरी न परतल्यामुळे शहर पोलिस ठाण्यात त्याच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष योगेश शर्मा (वय १३) रा. मल्लिकार्जून मंदिराजवळ, देशमुख प्लॉट, बार्शी हा रविवार ८ जून २०२५ रोजी सकाळी साडेसहाचे सुमारास सायकल खेळण्यासाठी घराबाहेर पडला. तो बराच वेळ घरी न परतल्यामुळे, त्याच्या पालकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, तरीही तो मिळून आला नाही.  त्याला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरुन पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रदिप झालटे करत आहेत.

गोरा रंग, सडपातळ बांधा, उंची १३५ सेंमी, अंगात निळा टीशर्ट व निळी पँट, मराठी, हिंदी व मारवाडी भाषा अवगत असे अपहृत झालेल्या मुलाचे वर्णन असून त्याबद्दल कुणालाही काही माहिती असल्यास बार्शी शहर पोलिस ठाणे दूरध्वनी क्र. ०२१८३-२२३३३३ / ९३२६८६१७९९ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोनि बालाजी कुकडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)