भाडेकरुनेच केली घरमालकाच्या घरात चोरी

Admin
0

 

The tenant was robbed in the house of the homeowner's house
The tenant was robbed in the house of the homeowner's house

बार्शी विशेष : शहरात झालेल्या चोरी प्रकरणाचा शोध घेत असता, भाडेकरुनेच घरमालकाच्या घरात चोरी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी भाडेकरु व त्याच्या साथीदारास अटक करुन त्यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. सुरज बाळासाहेब झरकर (वय ३२) व त्याचा साथीदार मित्र माधव सोनाजी कुलकर्णी (वय २१) दोघेही रा.हांडे गल्ली, बार्शी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.


६ जून ते दि. १७ जून २०२५ चे दरम्यान राहत्या घरातील कपाटाच्या ड्रॉवरमधून एकूण ३ लाख ९७ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दुर्गा नारायण पौळ रा. धनगर गल्ली, कसबा पेठ, बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती.


बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने या प्रकरणी तपास सुरु केला तेव्हा फिर्यादींच्या घरामध्ये भाड्याने राहणारे सुरज झरकर व त्याचा साथीदार मित्र माधव कुलकर्णी यांनी ही चोरी केली असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली. त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनीच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी त्यांचेकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला.


सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उप विभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल , पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोउनि उमाकांत कुंजीर, सपाफौ अजित वरपे, हवालदार अमोल माने, बाळकृष्ण दबडे, बाबासाहेब घाडगे, पोना संगाप्पा मुळे, पोकॉ अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, इसामियाँ बहिरे, रामेश्वर मस्के, चेतन झाडे, रतन जाधव यांनी केली आहे. पुढील तपास उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)