बार्शी शहर पोलीस तडीपार आरोपीला अटक करताना (AI Imgag)
बार्शी विशेष : सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले असतानाही आदेशाचे उल्लंघन करून बार्शी शहरात वावरणाऱ्या इसमास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. अखिल इब्राहिम सय्यद (रा. सुभाष नगर, बार्शी) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
२७ मार्च २०२६ रोजी, पोकॉ प्रल्हाद अकुलवार, अजिज शेख आणि राहुल उदार यांचे पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना तडीपार असलेला अखिल सय्यद हा त्याच्या सुभाष नगर येथील राहत्या घरासमोर फिरत असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली.
मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ सुभाष नगर भागात धाव घेतली. त्यावेळी अखिल इब्राहिम सय्यद हा पोलिसांना त्याच्या घरासमोरच मिळून आला. तडीपार असतानाही शहरात विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोकॉ इसमियाँ बहिरे हे करत आहेत.
तडीपार असलेले इसम बार्शी शहरात फिरत असताना आढळून येण्याची अलिकडच्या काही दिवसातील ही तिसरी घटना आहे.
