The auction process of destitute vehicles in the police station is completed
बार्शी विशेष : बऱ्याच वर्षांपासून बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव अखेर २२ मे रोजी पूर्ण झाला.
शहर पोलीस ठाण्यात झालेल्या या लिलाव प्रक्रियेत ३५ इच्छुकांनी सहभाग घेतला होता. ५ लाख ११ हजार रुपयांची बोली लावून एस. आर. एन्टरप्रायजेसच्या सूरज राऊत यांनी ही वाहने खरेदी केली. यामध्ये १२३ दुचाकी, १९ रिक्षा व ११ चार चाकी अशा एकूण १५३ वाहनांचा समावेश आहे.
लिलाव प्रक्रियेवेळी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, नायब तहसीलदार सानप, नालपे, पोनि बालाजी कुकडे, उपनिरीक्षक महेश गळगटे आदि उपस्थित होते.