शाळा व महाविद्यालयात दाखल्यांसाठी विशेष शिबीरांचे आयोजन

Admin
0

 

Special camps for Certificates in schools and colleges
Special camps for Certificates in schools and colleges


बार्शी विशेष : माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दरवर्षी दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची सेतू सेवा केंद्र व तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी होत असते. प्रसंगी वेळेवर दाखले न मिळाल्यास त्यांना प्रवेश प्रक्रियेपासून वंचित रहावे लागते. 


ही गैरसोय दूर करण्यासाठी यंदा शासन निर्देशानुसार शाळा व महाविद्यालयात तसेच मंडळ स्तरावर दाखले देण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर शिबीरांतून विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे, शिष्यवृत्ती तसेच नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे वेळेवर व योग्य दरात व सुलभतेने मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही पिळवणूक न होता योग्य रकमेत दाखले मिळतील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


शाळा व महाविद्यालय स्तरावरील शिबीरांचे वेळापत्रक याप्रमाणे :

Special camps for Certificates in schools and colleges

Special camps for Certificates in schools and colleges



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)