किराणा दुकानातील ९१ हजाराची बॅग चोरट्याने केली लंपास

Admin
0

 

Bag worth Rs. 91 thousand stolen from grocery store

Bag worth Rs. 91 thousand stolen from grocery store


बार्शी विशेष : किराणा दुकानात मालाची चौकशी करण्याच्या बहाण्याने ९१ हजाराची रक्कम ठेवलेली बॅग चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार घडला. या घटनेबाबत रमेश जवरीलाल बाफना (वय ७०) रा. लक्ष्मीनगर, बार्शी यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

बार्शीच्या मध्यवर्ती व्यापारपेठेतील पानखुंट चौकातील भगवंत सहकारी पतसंस्थेसमोर बाफना यांचे अरिहंत ट्रेडर्स नावाने किराणा दुकान आहे. सोमवार ७ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. माल खरेदी करण्यासाठी मागील दोन-तीन दिवसात झालेल्या विक्रीची रक्कम ९१ हजार ठेवलेली बॅग त्यांनी सोबत आणली होती, ती दुकान उघडल्यानंतर काउंटरखाली ठेवली.

सकाळी साडेअकराच्या दरम्यान मोटरसायकलवरुन आलेल्या एका इसमाने तांदूळ, मसाले इत्यादी बाबत चौकशी सुरु केली. त्याला मसाले दाखविण्यासाठी ते दुकानातील पाठीमागच्या भागात गेले त्यावेळी तो इसमही तेथे आला. मसाले बांधून देण्यास सांगत असताना त्या इसमाला कुणाचा तरी फोन आला. आमच्या लेडिज ऐनापूर मारुती मंदिरजवळ थांबल्या आहेत, मला पाचशे रुपये सुट्टे द्या म्हणाल्यामुळे बाफना यांनी काऊंटरखाली ठेवलेल्या बॅगेतून त्याला सुट्टे पैसे दिले. मसाले घेण्यासाठी तो इसम दुकानाच्या आतील बाजूस थांबला होता. त्याला देण्यासाठी मसाले बांधून ते घेऊन आले तोपर्यंत तो इसम निघून गेलेला होता. त्यानंतर बाफना यांनी काऊंटरच्या खाली ठेवलेली बॅग पाहिली असता ती तेथे दिसून आली नाही.

१५ मे रोजी दाखल झालेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिसांनी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)