कत्तलीसाठी गायी नेणारा टेंपो बार्शीत पकडला

Admin
0

 

A tempo carrying cows for slaughter was caught in Barshi
Stock Image

A tempo carrying cows for slaughter was caught in Barshi


बार्शी विशेष : २८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बार्शीतील रजपूत रेसिडेन्सी जवळ, रिंगरोड येथे सुमित नवले व किशोर अकोसकर यांनी टेंपो (क्र. एमएच१३-एन-९९१४) मधून कत्तलीसाठी दोन देशी गायी व एक जर्सी गाय घेऊन जात असलेल्या टेंपोचालकास पकडले असल्याचा कॉल नियंत्रण कक्षास प्राप्त झाला. 

त्यावेळी डायल ११२ वर दिवस गस्तीसाठी कर्तव्यास असलेले पोकॉ कुमार माने व पांढरे यांनी रिंगरोड येथे जाऊन पाहणी केली असता, सदर टेंपोमधून दोन देशी व एक जर्सी अशा ३ गायी मुसक्या आवळून, हालचाल करता येणार नाही अशा रितीने कत्तल करण्यासाठी परवाना नसताना टेंपोमधून नेताना आढळून आल्या. सदर टेंपो गायी व चालकांसह ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाणे येथे आणला.
 
पोकॉ कुमार माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, टेंपो मालक व चालक शफिक मोहम्मद शेख (वय ४०), रा. गोलेगाव, ता. भूम याचेविरोधात प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम, प्राण्याचे परिवहन नियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व म.पो. अधिनियमानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)