सचिन वायकुळे यांना 'महाराष्ट्र महागौरव' पुरस्कार जाहीर

Admin
0

 

Sachin Waykule conferred with 'Maharashtra Mahagaurav' award
Sachin Waykule conferred with 'Maharashtra Mahagaurav' award


बार्शी विशेष : येथील स्मार्ट अकॅडमी चे संचालक, लेखक तथा पत्रकार सचिन वायकुळे यांना, त्यांनी तृतीयपंथीयांसाठी व देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्य' यांचेकडून देण्यात येणारा 'महाराष्ट्र महागौरव २०२५' पुरस्कार जाहिर झाला आहे.


वायकुळे यांनी तृतीयपंथीय व देहविक्रय क्षेत्रातील महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला असून समाजातील या वंचित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.

Sachin Waykule conferred with 'Maharashtra Mahagaurav' award


राज्याचे उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सोलापूर जिल्हा पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि आयुष्यमान भारत महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत २५ मे रोजी पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सचिन वायकुळे, बार्शीतील मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे तसेच छत्रपती संभाजीनगर येथील उद्योगपती नामदेवराव खराडे यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार राजा माने यांनी कळविले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)