One arrested in Market yard theft case; Goods seized
बार्शी विशेष : बार्शीच्या आडत बाजारातील दुकानासमोर उघड्यावर ठेवलेला शेतीमाल चोरुन नेणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक करुन त्याचेकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
निलेश सुभाष साखरे (वय ३४) रा. रिंगरोड, सुभाषनगर, बार्शी यांनी त्यांच्या आडत बाजारातील प्लॉट नं. १३० येथे असलेल्या सुभाष उत्तरेश्वर साखरे (जनरल मर्चंट अँड कमिशन एजंट) या दुकानासमोरील कट्ट्यावर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला १४ पोती ज्वारी, ७ पोती सोयाबीन, ४ पोती पांढरी तूर, १ पोते हरबरा असा ४४ हजार ८०० रुपये किंमतीचा शेतीमाल उघड्यावर ठेवलेला होता.
सदर माल १९ एप्रिल २०२५ च्या सायंकाळी ६ ते ५ मे सकाळी दहाचे दरम्यान चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाणे येथे नोंदविली होती. याप्रकरणी तपास करताना पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपी अविनाश ज्ञानदेव आदाटे (वय २३), रा. बार्शी यांस ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यास अटक करुन पोलिसांनी त्याचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.
ही कामगिरी पो.अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पो.अधिक्षक प्रीतम यावलकर, उविपो अधिकारी जालिंदर नालकुल, पोनि बालाजी कुकडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउनि उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे, हवालदार श्रीमंत खराडे, अमोल माने, बाळकृष्ण दबडे, बाबासाहेब घाडगे, संगप्पा मुळे, अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अविनाश पवार, प्रल्हाद आकुलवार, इसमियाँ बहिरे यांनी केली. पुढील तपास हवालदार श्रीमंत खराडे करत आहेत.