विजय थोरात रचित 'भगवंत भजनांजली' चे ५ मे रोजी आयोजन

Admin
0

 

Vijay Thorat's 'Bhagwant Bhajananjali' to be held on May 5

Vijay Thorat's 'Bhagwant Bhajananjali' to be held on May 5

बार्शी विशेष : बार्शी शहरातील भगवंत भक्त विजय थोरात (कोरे) यांनी स्वरबध्द केलेल्या स्वरचित भक्तिरचनांचा 'भगवंत भजनांजली' कार्यक्रम ५ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता भगवंत मंदिर, बार्शी येथे संपन्न होणार आहे.


तसेच भगवंत जन्मोत्सवानिमित्त ८ मे रोजी आयोजित ह.भ.प. सद्गुरु डॉ. जयवंत बोधले महाराज यांच्या प्रवचनादरम्यान विजय थोरात निर्मित "भगवंत महात्म्य" या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा बोधले महाराजांचे पावन हस्ते होणार आहे. 


थोरात यांनी आत्तापर्यंत बार्शीचे ग्रामदैवत भगवंताची काकड आरती, परंपरागत आरती, भगवंत भजन, भगवंत स्तुती, भगवंत महात्म्य आणि भगवंत मंत्र अशा विविध १९ भक्तिरचना साकारल्या आहेत. भगवंत मंदिरात नित्य ऐकावयास मिळणारा त्यांच्या स्वरातील भगवंत मंत्र ऐकून मंदिरात येणारे भाविक मंत्रमुग्ध होतात.


संत साहित्याचे अध्ययन, अध्यात्म आणि भगवंत भक्तीविषयीचे बाळकडू त्यांना आई अरुणाबाई अंबादास थोरात आणि वारकरी आजोबा यांचेकडून मिळाले. बालवयापासून घरातून झालेल्या संस्कारांचा प्रभाव त्यांच्या रचनातून दिसून येतो.


ऑटोमोबाईल्स उद्योगातील यशस्वी व्यक्तिमत्व, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव, भ्रष्टाचार निर्मूलन समिती सोलापूर जिल्हा पीआरओ अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या विजय थोरात यांनी २०१८ पासून ओंकार मंत्राच्या अनुष्ठानानंतर लेखनाला सुरुवात केली. त्यातूनच त्यांनी स्वामी समर्थ महाराज, गणपती, आई-वडील आणि भगवंत यांच्याविषयी विविध रचना साकारल्या.


५ मे रोजी होणाऱ्या 'भगवंत भजनांजली' कार्यक्रमासाठी थोरात यांना प्रसिद्ध तबलावादक ऋषिकेश गोंदील आणि ख्यातनाम हार्मोनियम वादक अण्णा खारे साथ देणार आहेत. ग्रामदैवत भगवंताचे गुणगान श्रवण करणे ही सांस्कृतिकच नव्हे तर अध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे भाविकांनी अवश्य यावे असे आवाहन विजय थोरात यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)