The greatness of Lord Bhagwant should reach Maharashtra: Jaywant Bodhale Maharaj
बार्शी विशेष : भगवंताची विशेष कृपा असल्यानेच विजय थोरात यांना भक्तीरचना निर्मितीचा प्रसाद भगवंताकडून मिळाला आहे असे प्रसंशोद्गार ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांनी काढले. भगवंत जन्मोत्सवाचे औचित्य साधून विजय थोरात कोरे रचित व स्वरबध्द 'भगवंत महात्म्य' व 'भगवंत आरती' या रचनांचे ध्वनी स्वरुपातील संग्रहाचे विमोचन व लोकार्पण ह.भ.प. बोधले महाराजांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. भगवंताचे महात्म्य बार्शी पुरतेच मर्यादित न राहता महाराष्ट्रभर पोहोचावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ८ मे रोजी सायंकाळी भगवंत मंदिरात बोधले महाराजांचे प्रवचनापूर्वी हा सोहळा संपन्न झाला.
भगवंत भक्त विजय थोरात कोरे यांनी ग्रामदैवत श्री भगवंतावर तयार केलेल्या १९ रचनांपैकी स्वरबध्द केलेल्या ११ भक्ती रचनांचा 'भगवंत भजनांजली' कार्यक्रम ५ मे रोजी सकाळी भगवंत मंदिरात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितल कुलकर्णी यांनी केले. हार्मोनियम वादक अण्णा खारे, पखवाज वादक ऋषिकेश गोंदील व अभिजीत कदम हे साथीला होते. त्यांनी सादर केलेल्या भक्तीरचनांना उपस्थितांनी मनापासून दाद दिली.
यावेळी श्री भगवंत देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष दादासाहेब बुडुख, नाना सुरवसे, मुकुंद कुलकर्णी, अमृत (नाना) राऊत, सचिन वायकुळे सर, माऊली उद्योग समूहाचे आनंद दादा राऊत व त्यांच्या मातोश्री, शिवाजी गायकवाड, गुरुदत्त कुलकर्णी, योगदान सेवा महिला समिती, मानवता संयुक्त संघ, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बार्शी तालुका अध्यक्ष संगीता पवार, मिटे, लूमसे, बांगर, बागल, डीडवळ, सौदागर आदी भगिनी तसेच अनेक भाविक भक्त उपस्थित होते.