गांजा विक्री करणारे दोघे बार्शी शहर पोलिसांच्या ताब्यात

Admin
0


Two drug peddlers detained by Barshi city police
(प्रतिकात्मक चित्र)

Two drug peddlers detained by Barshi city police

बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून ४६२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सचिन कुमार मिरगणे (वय ३३) रा. सुभाषनगर, बार्शी व पांडुरंग सोमनाथ सोनवणे (वय४०) रा. मांडेगाव, ता. बार्शी अशी त्या दोघांची नावे आहेत. 

शहरात अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने शहर पोलिसांनी ताडसौंदणे रस्ता, सुभाषनगर येथील मिरगणे विटभट्टी पत्राशेड समोर थांबलेल्या दोन व्यक्तींची चौकशी केली असता, सचिन मिरगणे याचेकडे १० पाऊचमध्ये ४२ ग्रॅम गांजा व पांडुरंग सोनवणे याचेकडे ३६ पाऊचमध्ये ३२० ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण ४६ प्लॅस्टिक पाऊचमध्ये भरलेला ९ हजार ५० रुपये किंमतीचा, ४६२ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन त्या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई २९ एप्रिल रोजी रात्री अकराचे सुमारास करण्यात आली.

याबाबत सहा. फौजदार अजित शिवाजी वरपे यांनी फिर्याद दिली असून, सदर दोघाविरोधात शहर पोलिस ठाण्यात एन. डि. पी. एस. अ‍ॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (२) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)