Vinod Nanaware appointed Solapur district vice-president of Digital Media Council
बार्शी विशेष : डिजिटल मीडिया पत्रकारिता क्षेत्रातील सक्रीय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या "माझा न्यूज" चे प्रमुख संपादक विनोद ननवरे यांची मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
ही निवड प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थापक एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
विनोद ननवरे यांनी पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षे सक्रीय राहून सत्यता आणि पारदर्शकतेसाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली "माझा न्यूज" ने अनेक महत्त्वाचे सामाजिक आणि राजकीय मुद्दे समोर आणले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीचे सोलापूर जिल्ह्यात विशेष स्वागत करण्यात येत आहे.
या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सांगितले की, "डिजिटल मीडिया पत्रकारांवरील अन्याय आणि हल्ल्यांविरोधात संघटना सतत लढा देणार आहे. तसेच डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असतील."
नवीन जबाबदारी स्विकारल्यानंतर विनोद ननवरे यांनी संघटनेच्या उद्दिष्टांवर भर देत पत्रकारांच्या हक्कांसाठी भक्कम भूमिका घेण्याचे स्पष्ट केले. डिजिटल माध्यमांवर वाढत्या निर्बंधांविरोधात आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी संघटना ठोस पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.