ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरमधील सात उसतोड कामगार जखमी

Admin
0

 

Workers injured after being hit by truck

Workers injured after being hit by truck


बार्शी विशेष : उसतोडणीचे काम संपवून आपल्या गावाकडे परत जाणाऱ्या कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सात कामगार जखमी झाले. बार्शी लातूर बाह्यवळण रस्त्यावरील उपळाई ठोंगे चौकाजवळ हा अपघात झाला. 

ट्रॅक्टर चालक श्रीनिवास उर्फ गोविंद वैजीनाथ दराडे (वय २५) रा. सोनीमोहा, ता. धारूर, जि. बीड यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉली मधून उसतोड कामगारांची टोळी घेऊन ते सोनीमोहा गावाकडे परत जात असताना, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातचे सुमारास बार्शी लातूर बाह्यवळण रस्त्यावरील उपळाई ठोंगे चौकाजवळ समोरुन लातूरकडून आलेल्या कंटेनर ट्रकने (क्र. एमएच४४-यू-१०५७) ट्रॅक्टरला धडक दिली. यामध्ये काही कामगार किरकोळ व गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. १) कविता सुभाष बारेला (वय १५), २) विक्रम जितेंद्र उर्फ कालू बारेला (वय ३), ३) उषा जितेंद्र उर्फ कालू बारेला (वय २१), ४) मंदा रेवलसिंग बारेला (वय २१) चौघे रा. हरिपुरा, ता. यावल, जि. जळगांव, ५) युवराज दिलीप बारेला (वय ३), ६) प्रल्हाद रड्डा बारेला (वय १८) व ७) रेणकु ईडा बारेला (वय २१) तिघे रा. शिरवेल महादेव, ता. खरगुन, जि. इंदोर (मध्यप्रदेश) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

हयगयीने वाहन चालवून धडक दिल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीमधील कामगारांना दुखापत करण्यास तसेच ट्रॅक्टर व कंटेनर ट्रकचे धडकेमुळे नुकसान करण्यात कारणीभूत झाला म्हणून ट्रॅक्टर चालक श्रीनिवास उर्फ गोविंद वैजीनाथ दराडे यांनी ट्रक चालकाविरुध्द फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)